बारामती : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराचा धुराळा उडाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू केली जात आहे. यातच आता ०२ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. विद्या प्रतिष्ठान विद्यानगरीत होत असलेल्या या कार्यक्रमाला शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. तर आता शरद पवार यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे दादा स्विकारणार का ? शरद पवारांचं निमंत्रण. अशी चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार क्विचितच एका व्यासपीठावर येतांना दिसत आहेत. यातच आता बारामतीत होऊ घातलेल्या कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना निवास स्थानी चहापानासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील पाठवलं आहे.
शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, ०२ मार्च २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त आपण येत आहात. या कार्यक्रमासाठी संसद सदस्य या नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने अध्यक्ष या नात्याने अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करीत आहोत.
हेही वाचा…निलेश लंके डबल रोलमध्ये, ऐनवेळी घड्याळ सोडून तुतारी फुंकून भाजपचा गेम करणार?
तसेच पुढे बारामती शहरात प्रथमत येत असल्याचा मला आनंद झाल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दुरध्वनीवरून निमंत्रण यापुर्वीच दिले आहे. या निमंत्रणाचा आपण स्विकार करावा, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद पवारांनी दिलेल्या निमंत्रणाला अजित दादा जाणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव