नाशिक : आपसातील मतभेद-मनभेद विसरूवन महाविकास आघाडीच्या विजयासाठी कामाला लागा. लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा. असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना केले. पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पक्षातंर्गत बदल करण्यात आले. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
गुरूवारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. यावेळी ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यातच पदाधिकाऱ्यांना यावेळी ठाकरेंनी सुचना देखील केल्या. तर नव नियुक्त पदाधिकाऱ्यांंचं यावेळी स्वागत आणि अभिनंदन देखील केले. यामध्ये लोकसभा संघटकपदी विजय करंजकर, जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर वसंत गिते, विनायक पांडे, डी.जी. सुर्यवंशी, दीपक दातीर, अस्लम मनियार आदी उपस्थित होते.
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
दरम्यान, प्रत्येक बुथवर बुथप्रमुखांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करा. केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुती सरकारचे अपयश घरोघरी पोहोचवा. प्रत्येक बुथवरील यादीतील किमान अडीचशे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करून महाविकास आघाडीची भूमिका पटवून द्या. जबाबदारी दिली आता ती पुर्ण करून दाखवा, असेही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…लोणावळ्यात अजित पवारांना मोठा धक्का, तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामा, पुढची दिशा ठरली ?
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला जाहीर, २०, १८, १० जागावाटप होणार
हेही वाचा…“तर सामुहिक कट रचून आमची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल करू”, जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदाराच्या मुलीची युवासेनेत एंन्ट्री, ठाकरे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य