मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच राडा झाल्याने याची आता एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हा वाद शिंदे गटाकडून फेटाळून लावला आहे. तर विरोधकांनी यावरून जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“तर तटकरेंचा 1 लाख 20 हजार मतांनी पराभव होईल”, रायगडमध्ये अजित पवारांना बसणार मोठा धक्का ?
मिरवणुकांमध्ये गोळीबार करून, भर पोलीस ठाण्यात युतीतल्या नेत्यांवरच गोळीबार करून मन शांत होत नाही म्हणून आता थेट महायुतीतलं गँगवार भर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधिमंडळाच्या लाॅबीमध्ये जाऊन पोहोचलंय. महाराष्ट्राची राजकीय परंपरा महायुतीनं अक्षरशः धुळीस मिळवून टाकलीये. असं म्हणत महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी गॅंगवॉरमध्ये सरकार मात्र एक नंबरी असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा”
दरम्यान, आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरंतर महायुती सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने वेगवेगळे वाद या सर्व आमदारांनामध्ये होताना पाहायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा नंतरच ? मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला ?
हेही वाचा…“४ कोटीची थकबाकीतून फक्त २५ लाख भरले, राणेंना वेगळा न्याय अन् पुणेकरांना वेगळा,” विरोधकांचा सवाल