नांदेड : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त करत त्यांचे पुतळे जाळले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकही शब्द यावर काढला नाही. त्यामुळे अजित पवार यांना विरोधी पक्षांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
सुप्रिया सुळे ह्या सध्या नांदेडमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, अजितदादा वैयक्तिक सुट्टीवर आहेत. त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली तर चर्चा होते. हा माझ्या भावावर अन्याय आहे. असं सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.
“मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला
दरम्यान, गेले अनेक राज्यात राजकीय घडामोडी जोरदार घडत आहेत. मात्र या सगळ्या घटनांवर अजित पवार यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. गेले दोन ते तीन दिवस अजित पवार नॉच रिचेबल असल्याची माहिती देखील समोर आली होती. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे.
Read also
- “अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
- दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
- “शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”