मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधिमंडळात प्रवेश करत होते. आदित्य ठाकरेंना पाहून लगेचच नितेश राणे यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव म्याव म्याव’ अशा घोषणा दिल्या होत्या.
त्यानंतर राणेंवर पलटवार करण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी राणेंवर टीका केली. नितेश राणे यांनी वाघाला बघून मांजरासारखे म्याव म्याव केले. त्यांनी कॉक कॉक केले असते तरी आम्हाला काही वावगे ठरले नसते असं देखील त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर टीका करण्यासाठी एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी कोंबड्याला मांजरीचे तोंड असणारा फोटो हे कॉकटेल माहित आहे का ? असं म्हणत राणेंना डिवचलं होतं.
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR— nitesh rane (@NiteshNRane) December 25, 2021
आता आमदार नितेश राणे यांनी देखील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना उत्तर दिले आहे. नवाब मलिक यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांना अनेकदा भंगारवाला म्हणून काहींनी हिनवले आहे. आज सकाळी फेसबुकच्या माध्यमातून नितेश राणे यांनी एक फोटो कॅप्शन सहित अपलोड केला आहे. ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण? असं त्यांनी विचारलं आहे. यामध्ये एका डुकराचा फोटो देखील टाकण्यात आला आहे.
Read also:
- २१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?
- राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?
- विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?