नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्ष मेळावे प्रचार सभा घेत आहेत. निवडणूक तोंडावर आली की अनेक नेते नाराज होऊन पक्षांतर करताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरूनच कार्यकर्त्यांना सज्जड शब्दात दम दिला आहे.
किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर
राज ठाकरे म्हणाले की, ऐनवेळी निवडणूक तोंडावर येते. मग काही नेते नाराज होऊन पक्षांतर करतात. त्यामुळे ज्यांना कुणाला जायचं आहे. त्यांनी आताच जावे. असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काल मुंबईसह नाशिक येथील कार्यकर्ते मनसेच्या सभेला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास १७० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. त्यावर आता राज ठाकरे विचारविनिमय करून त्यावर निर्णय घेतील. मात्र यावेळी कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशाराही दिला. ज्यांना कुणाला सोडून जायचं आहे. त्यांनी अगोदरच निघून जावं. त्यानंतर जे नेते पक्ष सोडून जातील त्यांना पुढच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;
महापालिका निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अनेक पक्ष त्यासाठी तयारी करीत आहे. यावेळी निवडणुकीत राज्यातील पक्षांमध्ये मोठी चुरस बघायला मिळणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष बाजी मारेल ते आता पहाणं महत्वाचं ठरेल.
Read also:
- नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै; एकनाथ शिंदेंची उत्तर प्रदेशात गर्जना
- शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
- आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा