मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक दिवसांनी 20 मंत्र्यांच्या शपथविधी झाला. त्यातच आता शिंदे सरकारमधील दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून काॅंग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना खोचक टोला हाणला आहे.
“रोज सकाळी 9 वाजता अनेकांचे 12 वाजवणारे अन्…;”रोहित पवारांकडून राऊतांना Birthday च्या हटके शुभेच्छा
शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होत आहे. यामधून जनतेला कळणार की कोणी बांशिंग बांधून राहिले आहेत. अन् कुणाला नवरदेव करायताहेत. यातच ज्यांना नवरदेव करणार नाहीत. ते दुसरी नवरी शोधायला कुठे जाताहेत. ते आम्ही बघणार आहोत. तसेच जेवढे आमदार तिकडे गेले आहेत. त्यांना सगळ्यांना बाशिंग मिळणार नाहीत. त्यामुळे ते दुसरी नवरी शोधणारच असा टोला देखील त्यांनी लगावला.
“घरी बोलावून बेदम मारहाण करणाऱ्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”; चित्रा वाघ
तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहेत. राज्यातील अनेक राजकीय संघटना, नेते, एनजीओ इत्यादींनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे संपुर्ण भारताला जोडणारी ही यात्रा असून यामध्ये अनेक जण स्वंयुपुर्णतेने सहभागी होत आहेत. चंद्रपुरमधून देखील हजारो कार्यकर्त्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
Read also
- कुठं आहे महागाई? ४० हजार रुपयांचा मोबाईल आज 4 हजार रुपयांना मिळतोय
- आव्हाडांच्या पत्नीची महिला आयोगाकडे धाव..! म्हणाल्या, “त्या महिलेवर कायदेशीर करा”
- “भारत जोडो यात्रा मानवतेचा सागर, राहुल गांधी थकतच नाही,”; प्रणिती शिंदे
- “आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व”; अमृता फडणवीस
- ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण