मुंबई : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पावसाळी अधिवेशनातच घ्यावी अशी मागणी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसनं लावून धरली आहे. तसंच भाजपकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी होतेय. अशावेळी एक महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जातेय.
आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षपद निवडणुकीसाठी सकारात्मक आहेत. नागपूरमध्ये पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवड इतक्यात होणार नाही, असे म्हटले होते. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले होते.
Read Also :
- “…नाहीतर या सरकारने मला क्लिन चिट द्यावी”, प्रताप सरनाईकांची सभागृहात मोठी मागणी
- कराडमधील मोर्चा अंगलट; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा दाखल
- “आत म्हणतात तुमचा देशमुख करून टाकू, बाहेर म्हणतात भुजबळ करून टाकू; हीच तर भाजपची गुंडवृत्ती”
- रिक्त पदं भरण्यास मान्यता देण्यात आलीये; अजित पवारांची सभागृहात महत्वाची माहिती
- अधिवेशनातील ‘त्या’ कारवाईचे पुण्यात पडसाद; मोगलाई सरकारचा भाजपकडून तीव्र निषेध