पुणे : विधानसभेचे अधिवेशनाचे कामकाज चालू झाले. जनतेच्या न्याय हक्कासाठी, ओबीसी बांधवांच्या आरक्षणासाठी भाजपा न्याय मागत असताना त्यांच्यावर खुनशी भावनेनं आघाडी सरकारने भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन केलं. याचा जाहीर निषेध करण्यासाठी भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या १२ भाजप आमदारांचे निलंबन करून या आघाडी सरकारने आपली हुकूमशाही दाखवून दिली. लोकशाहीचा खून करून सत्तेत आलेलं हे आघाडी सरकार मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देऊ शकलं नाही. भाजप मराठा समाजाला, ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी संघर्ष करत आहे. आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळात आरक्षण देऊन त्यांनी ते आरक्षण टिकवल होतं. परंतु, हे आघाडी सरकार ते टिकवू शकले नाहीत, असे महापौर मुरली मोहोळ यांनी सांगितले.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार, वसुली तर चालू आहेच. त्याशिवाय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आजपर्यंत विधानसभेचे बरेच अधिवेशने झाली परंतु या प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाली. अधिवेशन दोन दिवसाचं परंतु निलंबन मात्र एका वर्षाचं वा रे वा ठाकरे सरकार. तुमचं दडपशाहीचं सरकार याशिवाय दुसरं तरी काय करणार? तुमच्याकडून याशिवाय अपेक्षा तरी काय ठेवायची. या सगळ्या गोष्टी मागचा ठाकरे सरकारचा उद्देश आपल्या सर्वांना माहिती आहे. या तीन चाकी सरकारला चांगलं माहिती आहे की आपलं सरकार कधीही पडू शकतं. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होऊ घातली असतानासुद्धा ती निवडणूक घेण्याचं या आघाडी सरकारच धाडस नाही. म्हणून आमदारांच संख्याबळ कमी करण्यासाठी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केले गेले. लोकशाहीच्या इतिहासातला हा काळा दिवस असून याचा आम्ही धिक्कार करतो, असेही मोहोळ यांनी सांगितले.
भाजपचे १२ आमदार निलंबित करण्यासाठी ठाकरे सरकारचा पुर्वनियोजित कट
भाजप कायमच न्याय, हक्कासाठी कटिबद्ध आहे. भाजपच्या सगळ्या १०६ आमदारांचे जरी निलंबन केलं तरी आम्ही मराठा समाजाला, ओबीसी समाजाला, महाराष्ट्राच्या जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊ असं काल देवेंद्रजी फडणीसांनी सांगितलं. माननीय देवेंद्र फडणीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार विरोधात लढत राहू. सरकारच्या या कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलन भाजप प्रदेश चिटणीस धीरजजी घाटे, महिला आघाडी पदाधिकारी, शहर भाजप पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व पुणे शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक आदी उपस्थित होते.
Read Also :
- फोन टॅपिंग प्रकरणावरून नाना पटोले आक्रमक, गृहमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची घोषणा
- आमदार रवी राणांनी राजदंड पळवला; मार्शलच्या सहाय्याने राणांची सभागृहातून हकालपट्टी
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशपातळीवर सन्मान
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
- मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले