अहमदनगर: देशात साखर आणि उपपदार्थ निर्मितीत सर्वोच्च पातळीवर अग्रगण्य असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचा केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी कर प्रमणालीत नियमित भरणा केलेला आहे. त्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचा देशपातळीवर सन्मान करण्यात आला आहे. सीबीआयसी विभागाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी सर्टिफिकेट ऑफ अप्रोप्रिएशन बेस्ट अवॉर्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान केला असल्याची माहिती अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली आहे.
हे पण वाचा, ‘‘नितीन गडकरींचे कारखाने योग्य पद्धतीने चालू आहेत’’; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव
राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कारखान्यांमध्ये संजीवनी साखर कारखान्याचा समावेश झाला आहे. कोल्हे म्हणाले माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी साखर कारखान्याने प्रत्येक हंगामातील संकटावर मात करण्यासाठी यशस्वी मार्गक्रमण सुरु ठेवले आणि आज त्याचे फळ मिळाले आहे. थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारा देशातील सर्वात पहिला कारखाना म्हणजे कोल्हे कारखाना. केंद्र शासनाने २०१७ पासून जीएसटी करप्रणाली लागू केली आहे आणि तेव्हापासून ते ३१ मार्चपर्यंत कोल्हे साखर कारखान्याने अत्यंत चांगले काम केले.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
हे पण वाचा, सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशी प्रकरणी हसन मुश्रिफांचे चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान
कोल्हे कारखान्याने अत्यंत सूक्ष्म माहितीचे संकलन करून संगणकीय पद्धतीने विहित नमुन्यात वेळेत जीएसटी भरला आणि शासनास योग्य ते सहकार्य केले. या सर्व कार्याबद्दल भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाने गौरव केलेला आहे. या पुरस्कारात कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी अशा सर्वांचाच वाटा आहे. शासकीय स्तरावरील २० विविध पारितोषिके मिळाली आहे आणि आताच्या मिळालेल्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या वैभवात नक्कीच भर पडला आहे असे देखील बिपीन कोल्हे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा,
“विरोधक आमच्यावर बॉम्ब फोडणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला”
उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, ओबीसींसाठी का दिला जात नाही?
“फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडविते, भाजपचा खरा चेहरा उघड”
धक्काबुक्की, धमक्या देणे , शिवीगाळ करणे याला माज म्हणतात, सचिन सावंत यांची भाजपवर टीका
अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश