पारनेर: पारनेर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका पारनेर साखर कारखाना बचाव समितीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. दरम्यान पारनेर बचाव समितीने पारनेरच्या विक्रीत मनी लॉन्डरिंग झाले असल्याचे पुरावे समोर आणून ई. डी. कडे चौकशीची मागणी केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीची करण्याची भूमिका ईडीने घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी बचाव समितीने पाठपुरावा केलेला होता मात्र पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे कारखाना बचाव समितीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे आणि त्यावर सुनावणी सुरु आहे.
हे पण वाचा, श्री छत्रपती शाहू साखर कारखाना देशात ठरला अव्वल; गुणवत्तापूर्ण साखर उत्पादनासाठी मिळाली ‘ही’ मानांकने
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
या याचिकेत पारनेर साखर कारखाना विकणारी राज्य सहकारी बँक व तो विकत घेणारी खासगी कंपनी, क्रांती शुगर प्रा. ली. यांच्या व्यवहारात काळा पैसा वापरला असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे. खासगी कंपनीचे लेखा परीक्षण अहवालात देखील दाखवलेले भांडवल आणि मालमत्ता पाहता हा कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेल्या रकमेवर संशय निर्माण होतो. राज्य सहकारी बँकेने हा साखर कारखाना एकाच विक्री निविदेला कसा विकला गेला आहे हा मोठा संशयाचा भाग आहे.
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
८ ऑगस्ट २०१५ रोजी ही निविदा सदरील कंपनीला मंजूर करण्यात आली होती. राज्य सहकारी बँकेने या खासगी संस्थेला रक्कम जमा करण्यासाठी पत्र पाठवलेल्या पत्रावरून समोर येते. याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली होती. खासगी कंपनीने या निविदेसोबत दि. ८ ऑगस्ट २०१५ यादिवशी आपण सव्वातीन कोटी रुपये बहाणा रक्कम राज्य सहकारी बँकेत भरल्याचे खोटे पुरावे खरेदीखताला जोडलेले आहेत. याच कंपनीला त्या दिवशी राज्य बँकेने तात्काळ दिलेले होते. मालमत्ता विकत घेत असताना शासनाला केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरलेले आहे. ‘पारनेर’ साखर कारखान्याच्या मालमत्तेवर असणारी इतर शासकीय देणी खरेदीखता वेळी बनावट सातबारा जोडून जाणीवपुर्वक लपवण्यात आलेली आहेत.खरेदीखतानंतर तीन वर्षांनी पारनेर कारखान्याच्या उरलेल्या सुमारे ३० एकर जमीनीचीही शुन्य रूपये मोबदल्यात बेकायदेशीर अदलाबदल करुन घेतलेली आहे.राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखान्यावर बनावट ( नोंदणी न केलेले ) सुमारे साडेचौदा कोटींचे गहाणखतही का करून ठेवले होते? हा प्रश्नही निर्माण होतो.
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
हे पण वाचा, “जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या अधिपत्याखालील क्रांती शुगर या कंपनीने पारनेरचा कारखाना विकत घेतला आहे. हा साखर कारखाना परत घेण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके प्रयत्नशील आहेत. बचाव समितीनेही आमदार लंकेच्या भूमिकेला पाठींबा दिला असल्याचेही रामदास घावटे यांनी सांगितले.
हे पण वाचा,
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील