पारनेर: पारनेर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका पारनेर साखर कारखाना बचाव समितीने औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. दरम्यान पारनेर बचाव समितीने पारनेरच्या विक्रीत मनी लॉन्डरिंग झाले असल्याचे पुरावे समोर आणून ई. डी. कडे चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे कारखाना बचाव समितीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे आणि त्यावर सुनावणी सुरु आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
सुमारे ३२ कोटींची मालमत्ता विकत घेताना शासनाला केवळ ५०० रुपये मुद्रांक भरले गेले होते. पारनेरच्या मालमत्तेवर असणारी इतर शासकीय देणी खरेदीखाता वेळी बनावट सातबारा जोडून जाणीवपूर्वक लपवण्यात आलेली आहेत. खरेदीखतानंतर तीन वर्षांनी पारनेरच्या उरलेल्या सुमारे ३० एकर जमिनीचीही शून्य रुपये मोबदल्यात बेकायदेशीर अदलाबदल करून घेतलेली आहे. राज्य सहकारी बँकेने पारनेरवर( बनावट नोंदणी न केलेले) सुमारे साडे चौदा कोटींचे गहाणखतही का ? करून ठेवले होते या सर्व बाबींचे पुरावे पारनेर बचाव समितीने मिळवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे.
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
यासर्व गोष्टींबाबद्दल पारनेरबचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद, साहेबराव मोरे यांनी सांगितले आहे. विक्री झालेला पारनेर सहकारी साखर कारखाना आता पुन्हा एकदा पाठीमागे घेण्यासाठी पारनेर- नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पारनेर कारखाना विकत घेणारी खासगी संस्था व बँकेच्या विरोधात कारखाना बचाव समितीने दाखल केलेले खटले यांच्यात काहीतरी तडजोड घडवून पारनेर कारखाना पुन्हा सहकारात आण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पारनेर समितीनेही देखील आमदार निलेश लंकेच्या भूमिकेला पाठींबा दिलेला आहे अशी महिती रामदास घावटे यांनी दिली आहे.
हे पण वाचा,
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील