मुंबई: “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली. पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन हिंदुराव देशमुख यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला माफ करुन अबोला सोडावा, अशी गळ देशमुखांनी घातली आहे.
हे पण वाचा: महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होता. या पहाटेच्या शपथविधीनंतर नितीन देशमुखांनी वाय बी चव्हाण येथे अजित दादांविरोधात घोषणाबाजी केली होती. नितीन देशमुख यांच्या भूमिकेबद्दल अजितदादांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
हे पण वाचा: गृहखात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मेहरबान, इतर पक्षाच्या नेत्यांवर मात्र कारवाई
घोषणाबाजी केल्यापासून आतापर्यंत म्हणजे दीड वर्षांहून अधिक काळ अजितदादा देशमुखांशी अद्यापही बोलले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नितीन देशमुख यांनी दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. “दोन हाना, पण मला आपलं म्हणा, मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट” अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.
हे पण वाचा: ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…
कोण आहेत नितिन देशमुख?
नितिन देशमुख हे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बोलणारे भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडाळकर यांच्यावर देशमुख नेहमीच तोंडसुख घेत आले आहेत.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
- ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…
- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का उठवली ? कारणे, परिणाम व उपाय..
- फडणवीसांना धक्का; जलयुक्त शिवार योजनेच्या एसीबी मार्फत चौकशीची शिफारस
- गृहखात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मेहरबान, इतर पक्षाच्या नेत्यांवर मात्र कारवाई