मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यात गुंतवणूक करणार असेल तर त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, असा आणकी एक नवा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला आहे.
वेळ आली तर तुमच्यावर जीव सुध्दा ओवाळून टाकेन; पंकजा मुंडेंची भगवानगडावर तुफान फटाकेबाजी
सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा मेव्हणा बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही उत्तर द्यावं लागणार आहे, असं सांगतानाच मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. उद्धव ठाकरे हे बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. पवार कुटूंबियांसाठी राज्याची जमीन चमकणारी आहे. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरूपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात, असा दावाही त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही – महादेव जानकर
अजित पवारांनी स्टेटमेंट केलं पण मग मी पुरावे ठेवले ना, मग पार्टनरशिप मागे का घेतली? असा सवाल करतानाच अजित पवार यांनी जमवलेली माया उघड केली. 9 दिवसांच्या धाडीचा दुसरा अंतिम रिपोर्ट येणं बाकी आहे. हे 1000 कोटींचे बेनामी व्यवहार आहेत. यात 15 मोठे सहकारी, पत्नी मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला.
Read Also :
- अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि गिरीष महाजन करणार चित्रपटाच भूमिका!
- ड्रग प्रकरणातील फ्लेचर पटेल कोण आहे ? त्याचं NCB च्या एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहेत? – नवाब मलिक
- अजित पवारांशी संबंधित १८४ कोटी बेहिशेबी मालमत्ता; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड
- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा; चंद्रकांत पाटलांची भन्नाट ऑफर
- मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा – देवेंद्र फडणवीस