मुंबई : पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. छत्री दुरुस्ती उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात सोमवारी हा उपक्रम सुरू करण्यात आला. मोहन जोशी यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले होते. मात्र या उपक्रमाची सोशल मिडीयावर चांगली चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, या उपक्रमाची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली असून, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, “सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या…’ असा खोचक टोला भातखळकर यांनी काँग्रेसला लगावला आहे.
दुसरीकडे, पावसाला सुरुवात होताच आपण आपली जुनी छत्री शोधतो. वर्षभर पडून राहिल्याने या छत्र्या बऱ्याचदा नादुरुस्त झाल्याचं पाहायला मिळते. याच नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे, असे जरी वरकरणी दिसत असले तरी, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं.
🤓😂😁 सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…
या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या… pic.twitter.com/gp6T8f1yeN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 18, 2021
Read Also :
- ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही; पकजा मुंडे म्हणतात…
- ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार
- ‘शिवस्मारकाचं काम वेळेत सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू’
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
- महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी, मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक होणार एक सदस्य प्रभाग पद्धतीनं?