बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी एक दिवसीय मराठवाडा दौऱ्यात, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीड जिल्ह्याच्या, महामारी आणि खरीप हंगामाबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी ते आले आहेत. यानंतर ते उस्मानाबादेत खरीप हंगाम आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेतला.
हे पण वाचा, बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
दरम्यान, यावेळी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागत ताफा अडवून केले आहे. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी, थेट उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, एवढेच नाही तर त्यांच्या गाडी समोर लोटांगण घातले. त्यामुळे, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला आहे. यामुळे आज अजित पवारांचा पारा चांगलाच वाढलेला दिसला आणि याचा प्रसाद, आज बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांना मिळाला असून, त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे.
हे पण वाचा, ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर मग हा असेल?’
अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आल्याचं, गाडीतून उतरून त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला बोलवा असं फर्मान सोडलं. यांनतर मुख्याधिकारी गुट्टे समोर येताच, ‘तुला प्रोटोकॉल कळत नाही का रे?’ असा थेट सवालच त्यांनी केला. ‘शहरात किती अस्वच्छता आहे. काम करता का? की काय करता? मी येणार म्हणल्यावर बैठकीला हजर राहता येत नाही? शहरातले डिव्हायडर का साफ नाहीत? दोन दिवसांत हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे, नाहीतर बघून घेतो,’ असा सज्जड दम त्यांनी यावेळी गुट्टे यांना दिला.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, एकत्र येणार?
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हजर होते. गेल्या आठवड्यातही अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर असताना, पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन त्यांनी, सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावले होते.
Read Also :
- महापालिका निवडणुकांसाठी आयोगाची तयारी, मुंबईसह १० महापालिकांची निवडणूक होणार एक सदस्य प्रभाग पद्धतीनं?
- ‘अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
- ‘तो दिवस लांब नाही ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील’
- ‘पंतप्रधानांचाच वारसा जपत भाजपने पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावला आहे’
- ‘संपूर्ण शिवसेनाच आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ?’