पुणे : पुण्यातील औँध येथील मयुर मुंडे या मोदीभक्ताने, ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून पंतप्रधानांच्या कार्याचा गौरव म्हणून, त्यांचे मंदीर बांधून दैवतीकरण केले. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. अशा प्रकारे मोदींचे मंदिर उभारण्यात आल्याने, त्यावर चहुबाजूंनी टीका होऊन, याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाला घ्यावी लागली आणि त्यामुळे रातोरात मंदीरातील मोदींचा पुतळा हटवण्यात आला.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
दरम्यान, या मंदिराच्या चर्चा थांबत नाहीत तोवर उपमुख्यमंती अजित पवार यांनी, वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये भव्य संजीवन उद्यानाचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना, पुणेकरांचे कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जातं, हे खरं आहे. पुणेरी पाट्यांबद्दल नेहमीच सर्वांना कुतुहल राहिलेलं आहे. त्याची सगळीकडेच चर्चा केली जाते. आता तर पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही,” असा मोदी मंदिराचा संदर्भ घेत त्यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर वाशिममध्ये दगडफेक; शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
दुसरीकडे, मंदिराची बातमी सर्वत्र पसरल्याने त्या ठिकाणी गर्दीही वाढत होती. अशातच रात्रीत मूर्ती गायब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. “आमचा देवच चोरीला गेला, आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? देशापुढील समस्या कोण दूर करणार ?, पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमचे पंधरा लाख रुपये आता तरी मिळणार का?, असे अनेक सवाल पुणे शहर राष्ट्रवादीच्या उपस्थित करण्यात आले.
Read Also :
- ‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा!’ राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादीची टीका
- “माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न”; संजय राऊतांची राणेंना टोलेबाजी
- बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं – नारायण राणे
- आमदार महेश लांडगेंचा “गनिमी कावा” : सांगलीत अखेर बारी झालीच; बैलागाडा शर्यतीचा लढा!
- गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना गुंगारा; भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत