पंढरपूर : आमदार समाधान दादा… डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते की, २०२० ला भारत महासत्ता होईल. मात्र, २०२१ मध्ये आमच्या कौठाळी गावच्या रस्त्यावरील खड्डे पाहिले की, असं वाटतयं वाटसरू आणि अब्दुल कलामांचे स्वप्न खड्यात चाललयं, अशा शब्दात आमदार समाधान औताडे यांना इयत्ता नववीत शिकणाऱ्या शगुप्ता राज इनामदार या मुलीने पत्र लिहीले आहे. कौठाली तालुका पंढरपूर येथील आहे.
‘तुमचा भुजबळ करू’ ही धमकी, आता त्यांना देता येणार नाही’
इनामदार आपल्या पत्रात पुढे म्हणते, मी आणि माझ्या मैत्रीनी या रस्स्त्यावरून शाळेला जाताना कित्तेक वेळा पडलोयं. अनेकवेळा मला मोठी दुखापतही झाली आहे. कित्तेक वयोवृद्धांच कायं? पण प्रौढ लोकांना देखील हा रस्ता अडथळा आणतोयं. एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली तर तिला योग्यवेळी उपचार मिळू शकत नाहीत, अशा शब्दात तीने रस्ताची दयनीय अवस्था व्यक्त केली आहे.
ईडीच्या कारवाईवर प्रताप सरनाईक यांनी दिला, पुन्हा ठाकरे सरकारला घरचा आहेर
पुढे ती म्हणते, माझ्या आजोबाच्या काळापासून हा आपल्या अंगावर खड्डे घेवून बसलायं. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता एका अवलियाची वाट पाहतोयं. जी त्याला पीडामुक्त करेलं. पण तो आवलिया दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आहात. तुम्ही आमची पिडा दुर करालं, अशा आशावाद देखील तीने या पत्रातून व्यक्त केला आहे. त्यामुळे, आमदार समाधान औताडे या नववीतील मुलीच्या पत्राची दखल घेवून रस्ताच्या कामाला सुरूवात करणार का? की तो असाचा पुन्हा भिजत पडणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
- पन्नास वर्षे झाली, सत्ता शरद पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची बोचरी टीका
- खासदार गिरीष बापटांचे वर्चस्व कमी करण्याचा घाट? भाजपचे नवीन शहर कार्यालय ‘राष्ट्रवादी’च्या शेजारीच
- ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र