पुणे : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी आता प्रत्येक पक्ष जागांची चाचपणी आणि दावा करतांना दिसत आहेत. यातच आता पुण्यातील मावळ लोकसभेवर आता वंचितने दावा केला असून स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा वंचितचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीत जागावाटपाच्या आधाची बिघाडी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा नंतरच ? मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला ?
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे म्हणून खासदार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तशी ठाकरे गटाने तयारीही केली आहे. यातच आता वंचितने मावळवर दावा सांगितल्याने तसेच स्वबळावर लढण्याचा इशारा दिल्याने आता वेगळचं वळण लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“४ कोटीची थकबाकीतून फक्त २५ लाख भरले, राणेंना वेगळा न्याय अन् पुणेकरांना वेगळा,” विरोधकांचा सवाल
दरम्यान, अलिकडेच वंचितने महाविकास आघाडीकडे वंचितने लोकसभेच्या २७ जागांसंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये पुणे लोकसभेसह मावळ मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतही मावळवरून रणकंदन माजलं आहे. श्रीरंग बारणे यांनी आधीच उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील यावर दावा सांगितला आहे. तर भाजपकडून बाळा भेडगे देखील भाजपला जागा मिळण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं, ” राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“महायुती सरकारमध्ये हमरी तुमरी,” शिंदे गटाचे दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की, विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…शिंदे गटातील दोन आमदार विधीमंडळाच्या लॉबीतच भिडले, दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा