मुंबई : ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना नीट आणि जेईई परीक्षेचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे
तसेच “पोलीस प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ लवकरच जाहिरात काढणार असून, प्रशिक्षणासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 300 विद्यार्थी निवडणार असून, एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 500 विद्यार्थ्यांची निवड गेली जाणार” असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Read Also :