कोल्हापूर – बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं कार्यक्रम १५ दिवसात जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यांनतर भाजप नेत्यांकडून महाविकासाआघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीकेबाजी केली आहे.
एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाची नवी योजना; शिवसेनाची जागा मनसे घेणार?
आता मराठा समाजाला कळून चुकलं कि पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं कि पवारसाहेब काय आहेत. सगळयांना कळून चुकणार. असा आव आणायचा कि मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
“राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”
भाजपला समाजात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण, पण भाजप कधीही त्यांच्या डावात सापडली नाही. भाजप समाजातील सर्व स्तरांमध्ये वाढत आहे. आता मराठा समाजाला कळून चुकलं की पवारसाहेब म्हणजे काय. आता ओबीसी समाजाला कळून चुकलं की पवार साहेब काय आहेत. सगळयांना कळून चुकणार. असा आव आणायचा कि मीच तारणहार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं? एवढ्या तुमच्या संस्था आहेत, त्यात एक निर्णय करून टाका ना की मराठा समाजाला इतके इतके टक्के देणार. काही त्याचं ऑन पेपरही आणावं लागत नाही. कोर्टातही कुणी जाणार नाही. पण नाही… इच्छाच नाही. आपण मोठं व्हायचं आणि बाकी सगळे आपल्या गाडीमागे फिरणारे निर्माण करायचे, अशीच निती राहिली आणि ही आता उघड होत चालली आहे. भाजपचं नाव घेतल्यानं काही फरक पडत नाही. समाजाला माहिती आहे की कुणाची काय भूमिका होती. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- “कुणी राजकीय बाजार भरवत असेल तर त्यालाही..”; राष्ट्रवादीचा मनसेला कडक इशारा
- राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी विद्या चव्हाण यांची वर्णी; पहिल्यांदाच विभागनिहाय अध्यक्षांचीही निवड
- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची साक्ष
- दानवे म्हणाले, ‘ब्राम्हण मुख्यमंत्री’, अजितदादा म्हणाले, ‘तृतीयपंथी मुख्यमंत्री’?
- राज्यात मनसेचं जोरदार आंदोलन; गैरहजर असणाऱ्या वसंत मोरेंनी सोडलं मौन, म्हणाले..;
- तुरुंगातुन सुटका होताच, नवनीत राणा रूग्णालयात दाखल; अनेक व्याधींनी त्रस्त