पुणे – रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना या पदावर कोण असणार याची उत्सुकता लागून होत मात्र आज राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा केली आहे. यासाठी विद्या चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राऊतांची तोफ आज पुण्यात धडाडणार; भोंगा, हनुमान चालिसा, हिंदुत्व, नेमकं काय बोलणार?
सुरुवातीला चित्रा वाघ यांच्याकडे प्रदेशाध्यक्षापदाचा कारभार होता. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या जागी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली होती. त्यांनतर आता विद्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षापदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षापदासोबत यावेळी पहिल्यांदा विभागनिहाय अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर विभागासाठी शाहीन हकीम यांची निवड करण्यात आली आहे. तर अमरावती विभागासाठी वर्षा निगम, मराठवाड्यात दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. औरंगाबादसाठी
शाझिया शेख, तर लातूर विभागसाठी वैशाली मोते यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कविता मात्रे यांच्या कडे पद सोपवण्यात आलं आहे तर पुणे विभाग हा वैशाली नागवडे यांच्याकडे तर सिंधुदुर्ग विभाग अर्चना घारे, ठाणे विभाग ऋता आव्हाड, तर उत्तर महाराष्ट्र विभागासाठी अनिता परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
शिर्डीत मुस्लिम समाजाचा नवा आदर्श; रोहित पवार म्हणाले, इथल्या जनतेच्या रक्तात ती भिनलीय
दरम्यान, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. त्यासाठी आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत. रूपाली चाकणकर यांच्यानंतर अध्यक्ष पद खाली होतं. आता यावर माझी निवड करण्यात आली आहे, अशी भावना नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.
Read also:
- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी भाजप सरकार जबाबदार; शरद पवारांची साक्ष
- दानवे म्हणाले, ‘ब्राम्हण मुख्यमंत्री’, अजितदादा म्हणाले, ‘तृतीयपंथी मुख्यमंत्री’?
- राज्यात मनसेचं जोरदार आंदोलन; गैरहजर असणाऱ्या वसंत मोरेंनी सोडलं मौन, म्हणाले..;
- तुरुंगातुन सुटका होताच, नवनीत राणा रूग्णालयात दाखल; अनेक व्याधींनी त्रस्त
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- “राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, पण भाजपने हात कलम केले, भोंगावादाचा हिंदूंवर बूमरँग होणार”