शिर्डी : आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नातीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा हट्ट वडील खासदार सुजय विखे- पाटील यांच्याकडे केला. तो सुजय विखे पाटलांनी पूर्ण केला. अनिषा विखे -पाटील हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठीचा वडील सुजय विखे- पाटील यांच्या ई-मेल वरुन मेल पाठवला.
मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
“मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय” असा ई-मेल तिने पाठवला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफीस मधून उत्तर आले. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला. त्यात भेटण्याची वेळे नमूद केली होती. मोदींनी भेटण्याचा अनिषाचा हट्ट पुरवला. खासदार सुजय विखे-पाटील सहकुटुंब नरेंद्र मोदींना भेटले. मोदींनी अनिषाला खायला चॅाकलेट दिले, मग दोघांच्या गप्पा रंगल्या. अनिषानं पंतप्रधानांच्या समोर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुम्ही इथे बसता का? हे तुमचं ऑफीस आहे? यावर हे माझं कायमचं ऑफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो. मी तर तुझ्याशी गप्पा मारायला आलोय.” अशी उत्तरं नरेंद्र मोदींनी अनिषाला दिली.
अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत तोवर अनिषानं पुन्हा प्रश्न विचारल,” तुम्ही गुजरातचे आहात का ? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदी हसले. यानंतर लगेच खासदार सुजय विखेंनी अनिषाला थांबवलं. नरेंद्र मोदींनी ५ ते ७ मिनिट अनिषाशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्या. या भेटी दरम्यान आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील, तसेच त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील उपस्थित होत्या.
Read Also :
- कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
- “मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव
- राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही? नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?