गडचिरोली : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्दयांना हात घातला. राज्य सरकारने दुकानात दारू विक्रीच्या परवानगीवरून देखील चौफेर शब्दात टिका केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे
राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सध्या राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. हा आक्राेश बाहेर काढण्यासाठी मी भाजपच्या वतीने आज याठिकाणांपासून सुरूवात करत आहे. कोरोनाकाळात आदिवासींना मदत करा. परंतु आपल्या सरकारने राज्यात दारु विक्री करण्याचा निर्णय घेतला. दुकानदारांना यासाठी लायसन्सची फीस पन्नास टक्के केली. गडचिरोली, चंद्रपूर आणि नंदूरबारच्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के वीज बील माफ केलं आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
राज्य सरकार आपला आवाज दाबू शकत नाही. या सरकारमध्ये आपला आवाज दाबण्याची तेवढी हिंमत नाही. त्यामुळे आमचा आवाज जनता आहे. जनतेवर अन्याय सहन आम्ही सहन करणार नाही. अन्याय झाला तर ही जनता तक्क पालटून टाकेल, जनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीमधून केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये सध्या भ्रष्टाचाराची 20-20 मॅच चालू आहे. दोन्ही संघ यांच्याच आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ असं या सरकारचं धोरण आहे. त्यामुळे आगामी 2024 साली विधानसभेत भाजपला बहुमत मिळेल आणि भाजचं सरकार येईल, असा अशावाद देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरूद्ध भाजप असा संघर्ष पेटला आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलचं तापलं आहे.
Read also:
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; मनसेकडून गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर
- “बाळासाहेबांचे विचार काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेना संपवत आहे”; नितेश राणे
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल
- “मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य