IMPIMP
Who are the MLAs of Shiv Sena qualified? There is no threat to the government, Rahul Narvekar's big decision Who are the MLAs of Shiv Sena qualified? There is no threat to the government, Rahul Narvekar's big decision

शिवसेनेचे कोण कोणते आमदार पात्र ठरले ? सरकारला कोणताही धोका नाही, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निकाल देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या चुकांचा पाडा वाचला. यातच उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका फेटाळून लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना पात्र ठरवलं आहे. तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

निवडणुक आयोगाचा निकाल महत्वाचा ठरवण्यात आला आहे. पक्षप्रमुख एकटेच निकाल ठरवून शकत नाही. असं झालं तर पक्षातील कोणीही पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. पक्षप्रमुख नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निकाल अंतिम असेल. त्यामुळे खरी शिवसेना  कुणाची हे घटनेवरूनच ठरणार आहे. पक्षप्रमुखाला सर्व अधिकार देणं हे लोकशाहीला घातक असल्याचंही निरिक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे.

राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवण्यात आलेल्या आमदारांची यादी

एकनाथ शिंदे , अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर