मुंबई : राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत.
मनसेच्या टार्गेटवर पुन्हा परप्रांतीय? शालिनी ठाकरेंचं गृहमंत्र्यांना १० मागण्यांचं निवेदन
रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण या दोघीही महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवत असतात. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?
दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण रयत संस्थेतील साधना कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुढे रुपाली चाकणकर यांच राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा प्रवास आहे.
…तर मी पदाचा राजीनामा देतो; मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
अलीकडेच वर्ध्याचे भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनबाईने सासरकडच्या मंडळींवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला होता. सासरकडची मंडळी मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पूजाच्या मदतीला धावून गेल्या होत्या.
Read Also :
- अनिल परबांनी किरीट सोमय्या विरुद्ध ठोकला १०० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा, सोमय्या आरोप सिद्ध करणार?
- नीती आयोगाशी समन्वय ठेऊन राज्याच्या विकासाला आणखी गती देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली’
- मराठा क्रांती मोर्चा-MIM आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा गाजण्याची शक्यता
- परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? महाराष्ट्रातील माणूस करत नाही का?