अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी होत आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपिकीशन बाजोरिया यांचे भाग्य उद्या उघडणार आहे. या निवडणुकीत गोपिकीशन बाजोरिया हे चौथ्यांदा उभे असून ते विजयाचा चौकार मारतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपकडून ही विजयाचा दावा करण्यात येत आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
अकोला विधान परिषद निवडणुकीत सेनेकडून गोपिकीशन बाजोरिया यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे उभेआहेत. दहा डिसेंबर ला मतदान झाल्यानंतर विजयाचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. तर या दोन्ही पक्षालाअंतर्गत वादामुळे नेमका कोणता उमेदवार विजयी होईल ही चर्चा संभ्रमात टाकणारी आहे. परिणामी, निकाल हाथी येण्याआधी मात्र विजयाचे पक्के दावे होत असले तरी या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी बाजोरिया होतील की पहिल्यांदा खंडेलवाल येतील यावर उद्याचा दिवस निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत 822 पैकी 808 मतदान झाले आहे. 14 मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे हे 14 मतदार कोणाच्या पथ्यावर पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
मतमोजणी14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. त्यामध्ये 25 मतपत्रिकेचे गठ्ठे करून ते 5 टेबलावर देण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरवात होणार आहे. या मतमोजणीमध्ये कुठलेही राउंड होणार नाही. थेट मतमोजणी सुरू झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. जवळपास दीड तासांच्या आत निकाल बाहेर येतील, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून तशी तालिम ही घेण्यात आली आहे.
Read Also :
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
- येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
- गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
- सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!