मुंबई : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत शिंदे गटातील वकिलांनी आता धनुष्यबाण गोठून ठेवाव अशी मागणी केली आहे. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोर आणि शिंदे गटावर जोरदार टिका केली जात आहे. यावरून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर कडाडून टिका केली आहे.
“तेव्हा उद्धव ठाकरे अन् आघाडी सरकार झोपा काढत होते का ?” मनसेचा सवाल
आगामी महापालिका निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी बुधवारी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे केली. येणाऱ्या महापालिका निवडणुक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा अशी मागणी बुधवारी शिंदे गटाचे वकिल नीरज कौल यांनी सुर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे केली. त्यावर बोलताना केदार दिघे म्हणाले की, शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे आम्हीच खरे म्हणणारे बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघाले आहेत. असं म्हटलं आहे. तसेच डरपोक गट असा उल्लेख देखील त्यांनी केला आहे.
“तेव्हा याकुब मेमनची कबर सजवत बसले अन् आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. मात्र तसं झालं नाहीतर जो आम्ही देखील त्या पद्धतीची तयारी करणार आहोत. कारण आता यापुढे जो कोणी हिंदुत्वाचा ज्वंलत विषय पुढे घेऊन जाणार आहे. त्यांनाच लोकांची साथ असणार आहे. शिवसेनेला चिन्ह मिळवण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण आमची संघटना आहे. चिन्ह घरोघरो पोहचवू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या मागच्या काळात काॅंग्रेसचे देखील निवडणुक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. परंतु तेव्हा काॅंग्रेस ती निवडणुक जिंकली होती. कितीही काहीही करा पण चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळणार, तसेच नाहीच मिळालं तर चिन्ह घराघरात पोहचवू. हा विश्वास आमच्या सर्व शिवसैनिकांना आहे. असं मत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.
Read also
- “भाजपमध्ये विलीन व्हा, नाहीतर स्वत:चा पक्ष काढा, जनतेला त्रास का ?” रूपाली पाटील
- “राहुल गांधींची पदयात्रा ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी”; सुप्रिया सुळे
- “मंत्रीपदासाठी शिंदे गटात सहभागी झालो नाही, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; बंडखोर आमदार
- “शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार का ?” शालिनी ठाकरेंचा पेडणेकरांना सवाल
- “प्रत्येकाला बारामती मतदारसंघ हवासा वाटणे, यात काही गैर नाही”; सुप्रिया सुळे