पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. रात्री दोन वाजता रोहित पवारांच्या हातात नोटीस देऊन बारामती अॅग्रोचे बारामतीतील दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेऊन राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तर या कारवाईवरून आता राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहणारे रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सत्तेच्या विरोधात जाणे हे अवघडचं असतं. त्याचे परिणामही भोगावे लागतात. जो व्यक्ती तयारीने उतरतो, वाट्टेल ते भोगण्याची तयारी ठेवतो आणि प्रमाणिक असतो, त्याला कसलीच भिती नसते. नेत्यावर व नेत्याच्या विचारावर निष्ठा ठेवतो आणि आव्हान देत भ्रमण करू लागतो, तेव्हा त्याच्या पायात पाय अडकविण्यासाठी खूप जण तयार असतात.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
कुठेच लडखडायचं नाही. पुढे चालत रहायचं. त्याच स्वागतच महाराष्ट्र करतो आणि करेल. हा देश लढवय्यांचा आहे. तेव्हा महाराष्ट्राला आज कळलं असेल की, आमदार रोहित पवार यांना नोटीस का आली. रोहित पवार तू असाच पवार साहेबांच्या मागे उभा राहशील. याबद्दल माझ्या मनात 100 टक्के खात्री आहे. असं म्हणत आव्हाडांनी रोहित पवारांना धीर दिला आहे.
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
दरम्यान, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाची नोटीस दोन मंत्र्यामुळे आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
काल रात्री आमच्या पक्षाचे सक्रिय आमदार व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मागे उभे राहणारे @RRPSpeaks यांना नोटीस बजावण्यात आली. सत्तेच्या विरोधात जाणे हे अवघडचं असतं. त्याचे परिणामही भोगावे लागतात. जो व्यक्ती तयारीने उतरतो, वाट्टेल ते भोगण्याची तयारी ठेवतो आणि प्रामाणिक असतो… pic.twitter.com/QBf5gcnz44
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांचा विचार नथुराम गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही,” गुणरत्ने सदावर्तेंची जोरदार टिका
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत