पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच पुण्यातील मनसेचे वसंत मोरे नेते सक्रिय झाले असून मैदानात उतरले आहेत. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आज हनुमान मंदिरामध्ये महाआरती करणार आहेत. पुणे येथील कात्रजमध्ये हनुमान मंदीरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज सायंकाळी महाआरती करणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे निघाले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत मनसेच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारने काय केले सांगा – चंद्रकांत पाटील
राज ठाकरे यांनी आझाद मैदानातील सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केली. यावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनाही मनसेकडून टीका सहन करावी लागली. यानंतर खालकर चौकातील महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते. त्यानंतर पक्षनैतृत्व आणि मोरे यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर ते ठाणे येथील उत्तर सभेत आले त्यांनी भाषणही त्यावेळी केले होते. याचदरम्यान हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते त्यानंतर यावेळी होणाऱ्या महाआरतीचे आयोजकच वसंत मोरे आहेत.
वसंत मोरे हे कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात आज संध्याकाळी ६ वाजता महाआरती करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मंदिराबाहेर स्टेजही उभारण्यात आला आहे. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, मी तीन दिवस तिरुपती बालाजीला असल्याने महाआरतीचे नियोजन झाले नव्हते. पण आज शनिवार असल्याने आणि पोलिसांची परवानगी मिळाल्याने महाआरती होणार आहे. दरम्यान मोरे यांच्या या महाआरतीत राज ठाकरे सहभागी होणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा
तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वात अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे आणि बाळा शेडगे यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेवून एक निवेदन सादर केले आहे. यात पुणे शहरात ४०० ते ४५० मशिदी आहेत. त्यातील जवळपास सर्वच मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे उतरवावेत किंवा कायमस्वरूपी बंद ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी मौलवींना पोलिसांच्या माध्यमातून तशी सूचना द्यावी. अन्यथा पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाआरतीसाठी मनसेने पुण्यातील कात्रज येथील कार्यालयासमोर जय्यत तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाचे महत्वाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे कटाक्षाने लक्ष देत आहेत. मंदीरासमोर व्यासपीठही उभारण्यात आले असून भगव्या रंगात सजावटीचे कामही सुरु झाले आहे.
Read also:
- राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
- “राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
- “भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- राज्याचे उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडवर; भाजप दिला दणका, ‘त्या’ नेत्याचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’
- स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी “यशस्वी-स्पर्धा परीक्षा संकल्प”; लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम
- राष्ट्रवादीला लागले हिंदुत्वाचे वेध? सहकुटुंबासह रोहित पवार आयोध्यत दाखल; राज्यात एकच चर्चा