पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रायगड संवाद दौरा सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण पाच सभा होणार आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. त्यावर आता ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील आशिष शेलार यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागणारे उबाठा गटाचे प्रमुख अस्तिवत्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत असल्याची टिका त्यांनी केलीय. मलपत्रात बातमी आली आहे की उद्धव ठाकरे यांचे रायगडमध्ये स्वागत मुंबईतील मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदार करणार आहेत. उत्तम अतिउत्तम असं म्हणत शेलारांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
त्यातच मुंबईतील मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन या. जमलेच तर दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झाला आहे. रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थने पाहणी करून या. रायगडचा झंझावती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ? या दौऱ्याला तमाम कोकणवासीयांनी शुभेच्छा द्याव्या का ? असा खोचक सवाल शेलारांना ठाकरेंना केलाय.
हेही वाचा…“भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ”, सुनील देवधर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
तुमची किळस येते शेलार…! बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला. बिल्कीस बानो ही कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे… परंतू माणुसकी विकून खाल्लेल्या तुमच्यासारख्या मुर्दाडांसाठी ती केवळ एक “मुस्लिम” आहे. तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्र्चाताप होत असेल. असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी लगावला आहे.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केल्यानंतर अंबादास दानवेंनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांनी मुस्लिम कार्यक्रमात हजेरी लावलेले शेलारांचे फोटो तसेच उद्धव ठाकरेंसमोर झुकणारा फोटो ट्विट केला आहे. त्याखाली दानवे यांनी काय ‘जनाब’ शेलार! आपले स्थान विसरलात वाटतं. आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी, जे आज सकाळीच आमच्या नावाचं भजन गायला लागतंय? असा खोचक टोला लगावला आहे.
तुमची किळस येते शेलार…!
बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला. बिल्कीस बानो ही कोणाची तरी मुलगी आहे, बहीण आहे… परंतू माणुसकी विकून खाल्लेल्या तुमच्यासारख्या मुर्दाडांसाठी ती केवळ एक “मुस्लिम” आहे. तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्र्चाताप होत असेल. https://t.co/TIhqCsnSGC— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“संजय गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे”, रूपाली पाटील आक्रमक
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया