मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून एसटी विलिनीकरणासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. याकाळात अनेक लोकांना अडचणीचा सामाना करावा लागला. तर एसटी कर्मचाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झालेत. याकाळात एसटीला देखील मोठा तोटा सहन करावा लागला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जुन महिन्यातील वेतनासाठी शासनाने १०० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे जुनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला ३६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रूपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील ३०० कोटी रूपये एप्रिलसाठी तर ३६० कोटी रूपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत.
“रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक इशारा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी आंदोलन खुपच गाजलं होतं. राज्यातील जवळपास सगळ्याच आगारमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. यामध्ये भाजपचे काही नेते देखील सहभागी झाले होते. तर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला केला होता. त्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याप्रकरणी वकिल गुणरत्ने सदावर्ते यांना अटक कऱण्यात आली होती.
Read also
- पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय? आमदार महेश लांडगे
- “संजय राऊत आता दोन चार वर्ष बाहेर येणार नाही, याची खात्री”; संजय शिरसाठ
- “हे देखील पण दिवस लवकरच जातील”; प्रणिती शिंदें
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार
- इडी, सत्ताधीशवाले तुम्हाला एकतर तुरूंगात, नाहीतर मारून टाकतील; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप