सोलापूर : “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. याच अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा तयार करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी पंढपूरमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशाराही धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक आदित्य फत्तेपूरकर यांनी दिला.
हे पण वाचा : धनगर आरक्षणावरून आता भाजपचा आणखी एक खासदार आक्रमक
हे पण वाचा : धनगर आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ सरकार जगाओ ‘ आंदोलनाची हाक
पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वाड्यामध्ये धनगर आरक्षण कृती समितीची आज (मंगळवारी) बैठक घेण्यात आली. या बैठकीत परमेश्वर कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शालिवाहन कोळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर आदित्य फत्तेपूरकर यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील दिला.
हे पण वाचा : धनगर आरक्षणात काका-पुतण्याचा काळाबाजार – गोपीचंद पडळकर
हे पण वाचा : धनगर आरक्षणासाठी पाडळकरांचं अनोख आंदोलन ; सरकारला रक्ताच्या 10 हजार बाटल्या पाठवणार
“सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच कारणामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी १६ जूनपासून कोल्हापूर येथे मराठा समाजाकडून आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील कायदा करण्यासाठी राज्य सरकार दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. त्याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कायदा पास करावा,” अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा. तेव्हाच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या शासकीय पूजेला यावे. जर धनगर आरक्षणावर निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीकडून देण्यात आला.
Read Also :
- “सोनिया ‘मातोश्रीं’ची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”
- आता ओबीसी समाजही आक्रमक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी ठरली आंदोलनाची दिशा
- सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा, म्हणजे बोलणाऱ्यांनाही गाडा…असं आहे ना.! – अजित पवार
- राष्ट्रवादीसमोर पेच; स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार कुठून आणणार?
- “ती” यादी राज्यपालांकडेच, मात्र आता ही यादी देणे शक्य नाही