अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. अहमदनगरच्या महापौर पदाची निवडणूक आता येत्या पंधरवाड्यात कधीही होऊ शकते. आमदार संग्राम जगताप कोणती राजकीय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हे पण वाचा अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
आमदार संग्राम जगताप यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आता शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी अहमदनगर महानगरपालिकेचा महापौर शिवसेनेचाच होणार असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे आहेत. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १ जुलैला महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित आहे आणि मी तुम्हाला यासाठी बॉण्ड देखील लिहून देऊ शकतो असा ठाम विश्वास शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा धक्कादायक: तिसऱ्या लाटेपुर्वीच अहमदनगर जिल्ह्यात तीन महिन्यात १८ हजार ६५४ बालकांना कोरोनाची लागण
आम्हाला कमी पडत असलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाची जुळवाजुळव आम्ही केलेल्या मुंबई दौऱ्यातच झालेली आहे. त्यामुळे महापौर पदाबाबत आम्हाला कसलीही चिंता नाही. शिवसेनेतील गट तट बाबत विचारले असता प्रत्येक पक्षात गटतट हे चालूच असतात मात्र योग्य वेळी ते एकत्र येऊन विशिष्ठ कामगिरी बजावतात हा इतिहास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे महापौर शिवसेनेचाच होणार आहे आणि महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला लवकरच तुम्हाला दिसेल असा विश्वास देखील दिलीप सातपुते यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
अहमदनगर मध्ये पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती, समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी
अहमदनगर जिल्ह्यात उभारला जाणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प; खासदार सुजय विखे
अहमदनगर मध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष पेटला
अहमदनगरच्या दुसऱ्या खासदारांवर होणार गुन्हा दाखल? खासदार सुजय विखे पाटलांना गनिमी कावा पडणार महागात