छत्रपती संभाजीनगर : दोन गटांमध्ये झालेल्या वादात घाटी रूग्णालयातील निवासी महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर उपचार करत असताना अचानक आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळकी रूग्णालयात घुसरील. त्यांनी महिला डॉक्टराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यामुळे महिला डॉक्टराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी घाटी रूग्णालय प्रशासनाने रूग्णालय त्याच्यासोबत आलेल्यांविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटांची आपसात तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणाच्या हातातील राॅडचा वार महिला निवासी डाॅक्टरच्या डोक्यात लागला व त्यांना गंभीर दुखापत झाली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आता शासकीय रुग्णालयांपर्यंत पोहोचली असून रुग्णसेवेत अडथळा निर्माण करत आहे, पण याकडे कुणाचेच लक्ष नाही. राज्यभरात महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण तर आहेच आता शासकीय रुग्णालयांतील महिला डॉक्टरांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. कायदा- सुव्यवस्थेचा इतका खालावलेला स्तर महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिलेला नाही, हे संपूर्णपणे राज्याच्या गृह खात्याचे अपयश आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
दरम्यान, घाटी रूग्णालयात रात्री साडेआठच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत महिला डॉक्टराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने महिला डॉक्टराचे डोके फुटले. या प्रकरणी घाटी प्रशासनाने रूग्णालय त्यांच्यासोबत आलेल्या विरूद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रा र दिलीय. दोन गटांमध्ये घाटी रूग्णालयामध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये एका गटातील जखमी शेख सय्यद शेख समशेर आणि शेख शेखिल शेख समशेर हे उपचारासाठी घाटीतील अपघात विभागात दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरांची सुरक्षा धोक्यात..!
घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटांची आपसात तुफान हाणामारी झाली. यात एका तरुणाच्या हातातील राॅडचा वार महिला निवासी डाॅक्टरच्या डोक्यात लागला व त्यांना गंभीर दुखापत झाली. राज्यातील वाढती… https://t.co/0IXKRj1MYC
— NCP (@NCPspeaks) January 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा, इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान देणार रामकुंड येथे भेट
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट