पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आठ आरोपींनी अटक करून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तर चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातच आता शरद मोहोळ हिंदुत्ववासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेतली. तर आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी मोहोळ कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केलं.
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट
आज चित्रा वाघ यांनी शरद मोहोळच्या घरी जाऊन मोहोळ कुटुंबियांचं सांत्वन केले. त्यांनी यासंदर्भात एक पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, हिंदुत्वाची पताका हाती धरलेल्या स्व. शरद मोहोळ यांचं काही काळापासून पुणे परिसरात हिंदुत्व जनजागृती गो रक्षण आणि लोकसेवेचं काम सुरू होतं… या कार्यात त्यांच्या पत्नी स्वातीताई याही खांद्याला खांदा देऊन साथ निभावत होत्या. पतीची साथ अर्ध्यावरच सुटली असली तरी स्वातीताई शरदभाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम नेटाने पुढं नेतील. स्वातीताई व मोहोळ कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटामध्ये त्यांचे सांत्वन करण्यासाठी आज आम्ही त्यांच्या पुण्यातल्या कोथरूडमधील निवासस्थानी भेट घेतली. तुमच्यावरील कुठल्याही संकटाच्या मुकाबल्यासाठी आम्हीही आपल्या सोबत असू, असा शब्द त्यांना यावेळी दिला..
हेही वाचा…“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
दरम्यान, शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी हिंदुत्ववादी असा उल्लेख करत शरद मोहोळचे बॅनर लावण्यात आले. तर नितेश राणे यांनी देखील मोहोळ कुटुबिंयाची भेट घेऊन हिंदुत्वासाठी शरद मोहोळ काम करत असल्याचं सांगितले. त्याचबरोबर शरद मोहोळचं राहिलेलं काम सुरूच ठेवणार असं शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी त्यावेळी सांगितले.
📍पुणे
हिंदुत्वाची पताका हाती धरलेल्या
स्व. शरद मोहोळ यांचं काही काळापासून पुणे परिसरात हिंदुत्व जनजागृती गो रक्षण आणि लोकसेवेचं काम सुरू होतं…या कार्यात त्यांच्या पत्नी स्वातीताई याही खांद्याला खांदा देऊन साथ निभावत होत्या. पतीची साथ अर्ध्यावरच सुटली असली तरी स्वातीताई… pic.twitter.com/zcwWdV0f4t
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेचा निकाल लागला, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची धाकधूक वाढली, कोण काय म्हणाले ? पाहा
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली