मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावरून अध्यक्ष अजित पवार गटांकडूनच निर्णय देणार ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर येत्या ३० जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. परंतु त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात धाकधुक वाढल्याचे दिसत आहेत.
हेही वाचा…“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
आमचा जो व्हिप आहे. तो पुर्वीच असून बदलेला नाही त्यामुळे व्हीपचा मुद्दाच नाही. व्हिपने दिलेला आदेश बरोबर आहे का ? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का ? या सगळ्या भोवती असंख्य गोष्टी फिरत होत्या. ते आपण शिवसेनेच्या प्रकरणात पाहिल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीबाबत अशा काही गोष्टी नाहीत. त्यामुळे आमच्या बाजू भक्कम आहे. त्यामुळे आम्ही व्हिप बदलेलाच नाही. असं मंत्री छगन भुजबळांनी म्हटले आहे. तर अजून आम्हाला बाजू मांडायची आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने बाजू मांडायची आहे. धाकधूड वाढण्याचा प्रश्न काही नाही आहे. आमची मेरीटची बाजू योग्य पद्धतीने मांडू. यातच आमची बाजू व्यवस्थित पाहिली तर विधानसभा अध्यक्षांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. असं जयंत पाटलांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला ६ जानेवारीला याप्रकरणासंदर्भात कागदपत्रे सोपवली गेली आहेत. तर ८ जानेवारील याचिकेसाठी अधिकची, तसेच अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ दिला होता. यातच आज याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणी करण्यात आली. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर केलेली कागदपत्रे तपासली गेली आहेत.
तर उद्या याचिकेशी संबंधित अजित पवार गटातील कागदपत्रांची पाहणी केली जाणार आहे. यातच १४ जानेवारील सुनावणीच्या वेळी कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर १६ जानेवारीला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल. तसेच यावेळई सुनावणीचे विषय नक्की केले जातील. १८ जानेवारीला प्रतिज्ञापत्र तर २० जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी केली जाणार आहे. तर २३ जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी केली जाईल. २५ आणि २७ जानेवारीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद होणार असून ३० जानेवारीला अंतिम निकाल लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट