मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शिंदे गटाने या निर्णयाचं स्वागत केलं तर ठाकरे गट निकालाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. यातच आज एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आक्रमक झाला असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
शिवसेना आमदार निकालाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या निकालाच्या विरोधात ठाकरे गट आणि इंडिया आघाडीने कोल्हापुरात निदर्शनने केलीत. कोल्हापुरच्या बिंदू चौकात काळे झेंडे दाखवत या निकालाचा निषेध नोंदवला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. तर पालघरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले. हुतात्मा चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
इचलकरंजीत देखील महाविकास आघाडीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राहुल नार्वेकरांचा निषेध व्यक्त करत ५० खोके एकदम ओके, शिंदे ओके अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. तर नाशिक, ठाणे , पुणे आणि तसेच मुंबईतही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या निकालाच्या विरोधात राज्य सरकारवर संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली.
READ ALSO :
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट