पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्यांना काल कोर्टात हजर केले असता सुनावणीत त्यांना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर पोलिस तपासामध्ये आरोपींकडे आणखीन तीन काढतुसे सापडली असून घटनेपुर्वी देखील आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटे पाडून मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो प्लॅन पुर्णत्वास गेला नसल्याने त्याचा कोथरूड भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
शरद मोहोळची हत्या करण्यापुर्वी मारेकऱ्यांनी मुळशीच्या घनदाट जंगलात गोळीबाराचा सरावही केला होता. तर मोहोळला मारण्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून तीन पिस्तूले आणि ११ काडतुसे खरेदी केली. मोहोळवर हल्ला करताना अजूक वेध साधता यावा, साठी त्यांनी मुळशीत सरावही केला. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पिस्तूल पुरवण्याप्रकरणी धनंजय मारूती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदारे कुठपर्यंत पोहचले आहेत. त्याची माहिती पोलीस करीत आहेत.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?
दरम्यान, पुण्यात गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर शरद मोहोळच्या अंतिम अत्यं संस्काराच्या वेळी अलोट गर्दी बघायला मिळाली. तर यातच आता धनकवडी भागात मोहोळला श्रद्धांजली वाहणारे प्लेक्स लागले आहे. या प्लेक्सवर मोहोळचा देशभक्त असा उल्लेख असून एका गुंडाच्या भावपुर्ण श्रद्धांजलीचे फलक लागले तरी महापालिका काय करीत आहेत? असा सवाल पुणेकरांना पडला आहे. यातच काही दिवसापुर्वी भाजप नेत्यांनीही मोहोळच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
READ ALSO :
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…