मुंबई : महाराष्ट्र शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधीमंडळाच्या सभागृहात पार पडत आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करीत आहेत. या सुनावणीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटातील नेते उपस्थित झाले आहेत. यासोबत शिंदे आणि ठाकरे गटातील वकिल देखील याचिकाच्या वेळी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थितीत झाले आहेत.
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा
आमदार अपात्रता निकाल वाचनासाठी विधीमंडळाच्या सभागृहात शिंदे गटाचे आमदार उपस्थित आहेत. शिंदे गटाकडून आतापर्यंत बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगूले, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, मधल्या रांगेत बसले आहेत. तर शेवटच्या बाकावर मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे सभागृहात एकत्रित बसले आहेत. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू, अंबादास दानवे, वैभव नाईक, सुनील शिंदे हे उजव्या बाजूच्या रांगेत बसले आहेत.
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीच्या वेळी विधीमंडळात दाखल होताच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले सभागृहात पोहताच जय श्री राम चा नारा दिला. तर ठाण्यातील आनंद आश्रम याठिकाणी आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच याठिकाणी जल्लोषाची तयारीला सुरूवात झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..