नवी दिल्ली : आगामी लोकसभा काही महिन्यावर येऊन ठेपली असतांना फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून भाजपने २०१९ च्या लोकसभेत पराभूत झालेल्या जागांवर उमेदवार ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष करून बारामती लोकसभेचाही यामध्ये समावेश असून अनेकांची धाकधूक वाढल्याचे चित्र सध्या राजकारणात बघायला मिळत आहे.
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?
राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक होत असून १६४ जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४३६ जागा लढवल्या होत्या, त्यातून भाजपला ३०३ जागांवर यश मिळालं होतं. तर १३३ जागांवर भाजपचा दारूण पराभव झाला. २७ जागा युतीच्या साथीदारांनी लढवल्या होत्या. परंतु त्यातही त्यांचा पराभव झाला होता. यामुळे आता १६० जागांसाठी भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे. यासाठी ४५ केंद्रीय मंत्री, १०० हून अधिक खासदार आणि नेत्यांना १६० मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे.
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपने गेल्या वेळी २५ जागा लढविल्या होत्या यावेळी भाजपने ३० जागा लढविण्याचा टार्गेट ठेवला आहे. यामध्ये नागपूर, बारामती, चंद्रपूर, औरंगाबादसह ६ जागांसाठी उमेदवारांची घोषणाही याच महिन्यात केली जाणार आहे. यातच देशातील १०० बड्या व्यक्तींना भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. यामध्ये कंगना रनौत, अक्षय कुमार, वीरेंद्र सेहवाग यांचाही समावेश असणार आहे. तसेच याची जबाबदारी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?