मुंबई : कत्ल हुए जज्बात की कसम खाकर, बुझी हुई नजरो की कसम खाकर, हम लडेंगे साथी, हम लडेंगे, जब बंदूक न हुई, तब तलवार होगी, जब तलवार न हुई, लडने की लगन तो होगी, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरण माने यांनी काही दिवसापुर्वीच उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. यातच काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटो ट्विट करत यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. यामध्ये त्यांनी शेरशायरींचा उल्लेख केला जात आहे. यातच औरंगजेबाने आपल्यावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता हिसकावणं सोपं असतं. रयतेची मनं जिकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून, बलाढ्या शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर राज्य करतो. असेही किरण माने म्हणाले.
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा
दरम्यान, शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर उद्धव ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला. आता उद्धव ठाकरे गटने निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यातच आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?