जळगाव : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात पुढील निवडणुकीत भाजपच्या अनेक खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सुन रक्षा खडसे यांचाही पत्ता कट होणार आहे. कारण मागच्या काही महिन्यांपासून स्थानिक पदाधिकारी रक्षा खडसे यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. भाजपच्या या अंतर्गत राजकारणावर रक्षा खडसे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रक्षा खडसे यांच्या जागी आता काॅंग्रेसच्या बड्या नेत्याची कन्या भाजपकडून मैदानात उतरणार असल्याचीही चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र निकाल, विधीमंडळात शिंदे अन् ठाकरे गटाचे कोण कोणते आमदार उपस्थित ?
रक्षा खडसे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी काॅंग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांचा मोठा पराभव केला होता. त्यावेळी त्यांना जवळपास ६५५३८६ मतं पडली होती. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपकडून उमेदवार बदलणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच उल्हास पाटलांची कन्या केतकी पाटील भाजपच्या वाटेवर असून २०२४ साली त्यांना मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा…निकालाची दुसरी बाजू, तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लॅन बी काय ?
केतकी पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर रक्षा खडसे यांचा पत्ता कट होणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचं अंतर्गत राजकारण उघड्यावर आलं आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसे यांना मोठा विरोध केला आहे. यासंदर्भात रक्षा खडसे यांनी देखील नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. तसेच मागील काही वर्षापासून लोकसभा मतदारसंघात अनेक कामे केली आहेत. लोकांना आवडली आहेत. परंतु पक्ष काय निर्णय घेतो, जर पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढविणार अस रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…निकाल आधीच ठरलाय..! राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाची आक्रमक भूमिका
केतकी पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. त्यावर केतकी पाटील म्हणाल्या की, अद्यापपर्यंत माझा निर्णय मी स्पष्ट केलेला नाहीय. मी भाजपच्या लोकांनाही आणि काॅंग्रेसच्या लोकांनाही भेटली आहे. रावेर लोकसभा क्षेत्रात माझं वाढतं काम पाहून ही चर्चा सुरू आहे. कोणत्या पक्षात जायचं हा निर्णय मी स्वत: सांगेन अशी प्रतिक्रिया केतकी पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत दिली आहे.
दरम्यान, दोन ते तीन दिवसांमध्ये केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माझी माहिती आहे. अफवा असतात कधी कधी परंतु केतकी पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला पाहिजे. परंतु भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. केतकी पाटील भाजपमध्ये जावो किंवा रक्षा खडसे भाजपमध्ये राहोत. कोणाला कुठेही जाऊदे, माझी एकच भूमिका आहे, पक्षाने मला आदेश दिले तर मी लोकसभा लढवणार अशी मोठी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपचे ‘ते’ १६४ उमेदवार ठरणार, बारामती, नागपूरसह राज्यातील अर्धा डझन जागा
हेही वाचा…“जब बंदूक न हुई, तब तलवार होगी,”शिवसेना प्रकरणाच्या निकालावर ‘किरण मानें’ची खणखणीत पोस्ट
हेही वाचा…शिवसेनेच्या खटल्याचं क्रेडीट भाजपकडून फडणवीसांना , मग खरा पातळयंत्रणी कोण याचं उत्तर मिळतंय
हेही वाचा…शिवसेना शिंदेंचीच, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच..!देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….