मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर शिंदे गटाकडून यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तर ठाकरे गट निकालाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. यानंतर आजच्या निर्णयामुळे घराणेशाही मोडीत निघाली. पक्ष कोणाचीही खासगी मालमत्ता नसल्याचं सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. त्याला आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संपुर्ण यादीच पाठवत शिंदेंवर हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…रक्षा खडसेंचा पत्ता कट होणार, ‘या’ काॅंग्रेस नेत्याच्या मुलीचा भाजप प्रवेश ठरला ?
राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. तर शिंदे गटाकडून मोठा जल्लोष व्यक्त करण्यात येतोय. यातच शिंदेंनी ठाकरेंवर घराणेशाहीवरून टिका केली. त्यावर आता ठाकरे गटाकडून पलटवार केला जात आहे. यातच अंबादास दानवे यांनी भाजप मधील राजकीय घराणेशाहीची यादी पाठवली आहे. अंबादास दानवे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे ४० आमदार भाजची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. २०१९ साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे.
अंबादास दानवे यांनी पाठवलेली यादी
१. देवेंद्र फडणवीस (भाजपचे गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र)
२. पंकजा मुंडे (माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या)
३. आकाश फुंडकर (भाजपाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र)
४. संतोष दानवे (सध्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र)
५. सुनील कांबळे (दिलीप कांबळे यांचे सुपुत्र)
६. सिद्धार्थ शिरोळे (माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र)
७. हेमंत सावरा (विष्णू सावरा यांचे सुपुत्र)
८. संदीप नाईक (भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र)
९. भरत गावित (माणिकराव गावित यांचे सुपुत्र)
१०. मदन भोसले (प्रतापराव भोसले यांचे सुपुत्र)
११. स्नेहलता कोल्हे (शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई)
१२. मोनिका राजळे (राजदीप राजळे यांच्या पत्नी)
१३. देवयानी फरांदे (एन. एस. फरांदे यांच्या सुनबाई) १४. समीर मेघे (दत्त मेघे यांचे सुपुत्र)
१५. राणाजगजितसिंग पाटील (पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र)
१६. संभाजी निलंगेकर (रुपाली निलंगेकर यांचे सुपुत्र)
१७. राहुल कुल (सुभाष कुल यांचे सुपुत्र)
१८. नमिता मुंदडा (स्व. विमान मुंदडा यांच्या सुनबाई)
१९. राधाकृष्ण विखे पाटील (बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र)
२०. वैभव पिचड (मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र)
२१. नितेश राणे (नारायण राणे यांचे सुपुत्र)
दरम्यान, रस्त्यावरील शिवसैनिक पारखून, त्याला निवडून आणण्याचे काळीज फक्त शिवसेनेत होत आहे आणि राहणार. आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात. कायदेशीर लढाया येतील आणि जातील. कायम असेल ती निष्ठा आणि विश्वास असंही दानवेंनी सांगितले.
मुख्यमंत्री @mieknathshinde महोदय, ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे ४० आमदार @BJP4Maharashtra ची पालखी धापा टाकत वाहत आहात, त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा. २०१९ साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतो आहे. पहा,…
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या