नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते मुंबईत जवळपास ३० हजार कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण आणि भुमिपुजन करणार आहेत. यामध्ये मुंबई-ट्रान्स-हार्बर लिंग, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-१चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स बेलापुर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे. त्याआधी नरेंद्र मोदी नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. तर इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान रामकुंडला भेट देणार आहेत.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांचा जोरदार नाशकात रोड शो सुरू झाला आहे. नरेंद्र मोदी पंचवटीतील रामकुंड येथे भेट देणार आहेत. इतिहासात देशाचे पंतप्रधान प्रथमच भेट देणार आहे. यामुळे रामकुंड परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रामकुंड परिसरात मोदी गोदा आरती देखील करणार आहेत. यातच रामकुंड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून एसपीजी, स्थानिक पोलीस, परजिल्ह्यातून आलेल्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
दरम्यान, आज नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठीचं ११ दिवसांचं अनुष्ठान सुरू करणार आहेत. २२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापुर्वीचे अनुष्ठान नरेंद्र मोदी आजपासून सुरू करणार आहेत. अनेक साधू संत, विद्धवांनी सांगितलेल्या नियमांचे पालन पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सुरू करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“नाशिकच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करणार 11 दिवसांचे अनुष्ठान”
हेही वाचा…“भविष्यात हाच घटनाक्रम राष्ट्रवादीच्या बाबतीतही पाहायला मिळेल”, श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीला केलं सावध
हेही वाचा…“शरद भाऊंचं हिंदुत्व जागृतीचं काम स्वातीताई नेटाने पुढं नेतील”, चित्रा वाघ यांनी घेतली मोहोळ कुटुंबियांची भेट
हेही वाचा…राणा दाम्पत्याला पुन्हा अटक होणार ? कोर्टाने दिला कडक इशारा
हेही वाचा…मोठी बातमी..!”पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला”