मुंबई : फक्त मैदान मिळवण्यासाठी दोनशे मोटारगाड्या घेऊन मुंबईत गेले. मग हे सर्व गरीब असतील तर माझ्यासमोरील माळी तेली, तेलगी हे सर्व श्रीमंत आहेत का ? मराठा समाजातील अनेक जण मोठे होऊन डॉक्टर होतात, वकिल होतात. परंतु आजही ओबीसी समाजातील लोकं गरीब आहेत. मग आरक्षण कुणाला मिळायला हवं? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपुरात झालेल्या सभेत केला. यावेळी इतर ओबीसी नेत्यांनीही राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
गरीब आहेत की श्रीमंत आहेत. यावर आरक्षण दिलं जात नाहीत. तर सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आरक्षण दिलं जातं. असं म्हणत भुजबळांनी एमपीएमसीतील भरतीसंदर्भातील जागांसंदर्भातही भाष्य केले. आम्ही ओबीसी म्हणून एकत्र झालो आहे. त्यामुळे मराठ्यांचं आंदोलन आम्ही सहजपणे अरबी समुद्रात बुडवून टाकू असे प्रकाश शेंडगे म्हणाले. तसेच आपल्याकडे कोयता, परशू आणि काठी आहे. त्यामुळे काळजी करू नका. असंही त्यांनी सांगितले. तसेच १० लाख गाड्या. २०० जेसीबीने फुले उधळायला. हेलिकॉप्टरने फुले उधळणारा समाज गरी आहे म्हणे. असली गरीबी आम्हालाही येऊ दे. असे साकडे मी पांडुरंगला घालतो. असेही ते म्हणाले.
हेही वाचा..“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ७५ वर्षे सत्तेत बसलेले नाग आहेत. त्यांनी तुम्हाला गरीब बनवले आहे. तुम्हीच सत्तेत आहात.. त्यामुळे त्या जाणत्या राजांना विचारा की सोलापुर जिल्ह्यात सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य मराठा आहेत. यापुढच्या काळात आता ओबीसी नेत्यांना निवडून द्या. असे आवाहनही प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना केले.
READ ALSO :
हेही वाचा“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार
हेही वाचा..मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….