नागपूर : शिवसेनेला राज्यात मोठे खिंडार पडत असल्याची चिन्हे दिसत असून, काल शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता विदर्भातील शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
“निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”
शिवसेनेचे चार टर्मचे नागपूरमधील रामटेक मतदारसंघाचे आमदार आशिष जैसवाल पक्षावर नाराज असून, “३० वर्षे सेनेत काम केलं; पण मला सन्मान मिळाला नाही. माझ्या मागून येऊन बाहेरच्यांना मंत्रिपदं मिळाली, मात्र माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक शिवसैनिकांना अजूनही पक्षात न्याय मिळालेला नाही,” असं म्हणत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.
”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
“पक्षात पुढे जाण्यासाठी, पक्षासाठी काम करण्यासाठी अनेक शिवसैनिकांना अजूनही संधी मिळत नाहीये. त्यामुळे, आम्ही नाराज आणि दुःखी आहोत. सध्या विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, मग शिवसेना एक पक्ष म्हणून या भागांत कसा वाढणार?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, शिवसेनेला अजून एक मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका!
दुसरीकडे, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री आमदार अशोक शिंदे हे, काँग्रेसच्या वाटेवर आहेत, तर ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश (बाळा मामा) म्हात्रे, हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Read Also :
- एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सापळा रचला – प्रवीण दरेकर
- फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला
- “मोदी सरकारमध्ये फक्त नितीन गडकरींमध्येच आवाज उठवण्याची हिंमत” – पी. चिदंबरम
- …म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी केला खुलासा!
- “चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”