पुणे : आगामी काळात देशात काही राज्यांत विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुका देखील त्यानंतर होत आहे. यासाठी सगळ्याच राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू करून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे आमदार परराज्यात दौरा करणार आहेत. सुरूवातीला सगळ्याच आमदारांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर प्रत्येक आमदार निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. यातच महाराष्ट्रातील भाजपचे ५० आमदार मध्यप्रदेशला रवाना झाले आहेत.
हेही वाचा…खासदार कोल्हे कुणासोबत? : म्हणतात… विचारांसाठी शरद पवार अन् विकासकामांसाठी अजित पवार!
मध्यप्रदेशमधील ४६ विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्रातील ५० भाजप आमदार, नेत्यांना येत्या दोन दिवसांत मध्यप्रदेशात पाठवावे, असा आदेश पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. त्यानुसार उमेदवारांचे नाव निश्चित करून येत्या २५ ऑगस्टपर्यंत भाजप श्रेष्ठींना कळविण्यात येईल. खांडवा, बुऱ्हाणपूर, खरगोन,बैतूल, आमला, छिंदवाडा, बालाघाट जिल्ह्यांतील या विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्याबरोबरच त्याला जिंकून आणण्याची जबाबदारी तडफदार भाजप नेते, आमदारांवर सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा…नितीन गडकरींचा काटा काढण्याचा नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांचा मोठा डाव
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशमधील १०० भाजप आमदारांवर मध्यप्रदेशातील १०० जागांची तर गुजरातमधील ५० भाजप आमदारांवर मध्य प्रदेशातील ५० जागांची, बिहारमधील भाजप आमदारांवर ३० जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मध्ये प्रदेश, छत्तीसगड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी दिली जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
हेही वाचा…शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंना घातला गराडा, मुंडेंवर प्रश्नांची केली सरबत्ती
हेही वाचा…महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी