पुणे : आगामी काळात देशात काही राज्यांत विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुका देखील त्यानंतर होत आहे. यासाठी सगळ्याच राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू करून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे आमदार परराज्यात दौरा करणार आहेत. सुरूवातीला सगळ्याच आमदारांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्यानंतर प्रत्येक आमदार निवडणुकीचा प्रचार करणार आहेत.
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शड्डू ठोकला आहे. विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतर याचा मोठा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील प्रत्येक आमदारांना आता परराज्यात प्रचारासाठी मैदानात उतरवले आहेत. भाजपचे काही नेते तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात प्रचार करण्यासाठी जाणार आहेत.
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक
दरम्यान, विरोधकांची इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक येत्या ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात काॅंग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बैठक सत्रांचा धडका लावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…खासदार कोल्हे कुणासोबत? : म्हणतात… विचारांसाठी शरद पवार अन् विकासकामांसाठी अजित पवार!
हेही वाचा…नितीन गडकरींचा काटा काढण्याचा नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांचा मोठा डाव
हेही वाचा…“तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…पुन्हा दावे-प्रतिदावे, पुन्हा तेच तेच..! शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, ८ सप्टेंबरपासून खटला सुरू
हेही वाचा…भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल, पण शरद पवारही भाजपचा गेम करतील ?