मुंबई : कॅगच्या अहवालातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातील सात मोठे घोटाळे उघड झाले आहेत. या घोटाळ्यावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर देशातून तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. यातच कॅगच्या अहवालाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी अन् अमित शाह करीत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…बीड जिल्ह्यात शरद पवारांची मोठी पेरणी , मुंडेंसह भाजपला मोठं आव्हान, चार बड्या नेत्याचा पक्षप्रवेश
प्रत्येक विभागमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्याने कॅगने त्यांच्यावर ताशोरे ओढले आहेत. केंद्रात नितीन गडकरी यांची नक्कीच विकासाची प्रतिमा असल्याने उद्या त्यांच्या बाजूने जनमत ठरू शकतो. त्यामुळे त्यांना राजकारणातून बाहेर काढायचं. अन् त्यांचं राजकारण संपवायचं असा दृष्टीकोन असू शकतो. मोदी अन् अमित शहा हे नितीन गडकरींचा काटा काढण्याच्या तयारीत आहे. असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
दरम्यान, कॅगच्या अहवालामध्ये नरेंद्र मोदी यांचे सात मोठे घोटाळे उघड झाले आहेत.
दिल्ली द्वारका द्रुतगती महामार्ग घोटाळा
यामध्ये दिल्लीचा द्वारका द्रुतगती महामार्ग मध्ये प्रतिकिमी प्रस्तावित खर्च १८ कोटी असतांना त्यात २५० कोटी दाखवण्यात आला आहे.
भारतमाला प्रकल्प
भारतमाला प्रकल्पात बांधणीचा खर्च १५.३७ कोटी परंतु ३२ कोटी दाखवण्यात आला आहे.
टोल घोटाळा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ५ टोलनाक्यांद्वारे १३२ कोटी लूट करण्यात आली आहे.
आयुष्यमान भारत
आयुष्यमान भारत योजनते ७.५ लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करण्यात आली आहे.
हिंदूस्तान एरोनॉटिक्स
सदोष इंजिन विकसित केल्यानं १५४ कोटीचं हिंदूस्तान एरोनॉटिक्समध्ये झालं आहे.
अयोध्या विकास प्रकल्प
कवडीमोल दरानं भूखंड घेऊन राम मंदिर ट्रस्टला चढ्या दरानं विकाला आहे.
पेन्शन योजना
ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंगाच्या पेन्शनचा निधी स्वच्छ भारत योजनेच्या फलकांसाठी वळवला असल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही घाबरताय, तुम्हाला लोकशाही नकोय”, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…पुन्हा दावे-प्रतिदावे, पुन्हा तेच तेच..! शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात, ८ सप्टेंबरपासून खटला सुरू
हेही वाचा…भाजपनं पावलं टाकत राष्ट्रवादीचाच गेम केला असेल, पण शरद पवारही भाजपचा गेम करतील ?
हेही वाचा…शरद पवारांच्या सभेला पैसे देऊन लोकांची गर्दी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हेही वाचा…मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक स्थगित, विद्यार्थी सेना आक्रमक